Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

India-Pakistan War: आयएनएस विक्रांतचा कराचीत घातक हल्ला! पाक नौदलाचे तळ उद्ध्वस्त; बंदर परिसरात भीषण आग




भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असून आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानने पुन्हा हल्ले सुरू केले, ज्याला भारताने तात्काळ प्रत्युत्तर दिलं. हवाई दलानंतर आता भारतीय नौदलही अ‍ॅक्शन मोडवर असून, अरबी समुद्रात तैनात असलेल्या भारताच्या शक्तिशाली विमानवाहू युद्धनौके आयएनएस विक्रांतने पाकिस्तानच्या कराची आणि ओरमारा बंदरांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयएनएस विक्रांतवरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमुळे कराची आणि ओरमारा या दोन्ही बंदर परिसरात भीषण आग लागली असून, आकाशात धुराचे लोट पसरले आहेत. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, किनारी भागातील लोक आतल्या सुरक्षित भागांकडे धाव घेत आहेत.

कराची आणि ओरमारा बंदर हे पाकिस्तानी नौदलाचे महत्त्वाचे तळ आहेत. याठिकाणी पाकच्या युद्धनौका, पाणबुड्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्यालये आहेत. आयएनएस विक्रांतच्या या कारवाईने पाकिस्तानच्या नौदलाला जबर धक्का बसला आहे. सध्या भारतीय नौदलाचं ऑपरेशन सुरू असून, आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानला आयएनएस विक्रांतच्या उपस्थितीची भीती आधीपासूनच होती. हे भारताचं अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौक असून, यावर ३० मिग-२९के लढाऊ विमाने तैनात आहेत. त्याचबरोबर त्याला साथ देणारे विध्वंसक, फ्रिगेट्स, इंधन टाकी जहाजं आणि पाणबुडींचा ताफाही आहे. त्यामुळे हे युद्धनौक पाण्यातील संपूर्ण हवाई तळ म्हणून ओळखलं जातं.

या हल्ल्यामुळे भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की, कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही आणि त्याला दुपटीने प्रत्युत्तर दिलं जाईल. संपूर्ण देशभरात भारतीय नौदलाच्या या कृतीचं समर्थन होत आहे, तर पाकिस्तानमध्ये घबराट आणि अस्थिरता निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या