Ticker

🔴 BREAKING NEWS
Loading...

Ad Code

yawal यावलमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती; 31 जुलैपर्यंत अर्ज, 20 जागांसाठी संधी

यावलमध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती प्रक्रिया सुरू; 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी



यावल | प्रतिनिधी महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS), यावल यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी 20 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, पंचायत समिती, यावल येथे स्वीकारले जाणार आहेत. भरती प्रक्रियेत 1 अंगणवाडी सेविका आणि 19 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 20 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

महिला व बालविकास विभागाने अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच 31 जुलैनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणताही विचार केला जाणार नाही, असेही सूचित करण्यात आले आहे.

उमेदवारांची निवड शासनाच्या नियमानुसार गुणवत्ता यादी (Merit List) तयार करून करण्यात येणार आहे.

https://www.youtube.com/@jalgaonnews

महत्त्वाच्या तारखा

  • 📌 अर्ज स्वीकारण्याची मुदत : 20 जुलै ते 31 जुलै 2026
  • 📌 अर्ज छाननी : 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026
  • 📌 गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 10 ऑगस्ट 2026

रिक्त पदे असलेली प्रमुख गावे

  • हंबर्डी (सेविका)
  • बामणोद
  • चितोडे
  • शिरसाड
  • साकळी
  • न्हावी
  • सातोद 
  • किनगाव (बु. व खु.)
  • निमगाव
  • पाडळसे
  • हिंगोणा
  • मारुळ
  • नावरे
  • मोहराळे
  • कोळन्हावी
  • यावल
  • आंबापाणी
    आदी गावांचा समावेश आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0