Ticker

🔴 BREAKING NEWS
Loading...

Ad Code

Jalgaon : जळगाव बसस्थानकावर गर्दीचा फायदा; महिलेचे ४५ हजारांचे मंगळसूत्र लंपास



जळगाव | प्रतिनिधी जळगावच्या नवीन बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका ५२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा अजय भोसले (वय ५२, रा. कळवा, जि. ठाणे) या शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास नवीन बसस्थानकातून चाळीसगावकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी, मंगळसूत्र आणि कानातील टोंगले असा एकूण ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच त्यांनी तक्रार दाखल केली असून, जिल्हापेठ पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0