Ticker

🔴 Breaking News • जळगाव • भुसावळ • यावल • रावेर • अमळनेर • चाळीसगाव • पाचोरा • जामनेर • चोपडा • शेती • राजकारण • गुन्हे • नोकरी • शिक्षण • आरोग्य • क्रीडा • Maharashtra News • www.jalgaonnews.com

Ad Code

Jalgaon-Pune Flight Delayed सलग दुसऱ्या दिवशीही जळगाव–पुणे फ्लाइट लेट; प्रवाशांच्या संयमाची परीक्षा कधी संपणार?


जळगाव | प्रतिनिधी जळगावहून पुण्याकडे जाणाऱ्या फ्लाय ९१ (Fly91) कंपनीच्या विमान सेवेचा विलंब सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नियोजित वेळेपेक्षा सुमारे दोन तास उशिराने विमानाने उड्डाण केल्याने व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले.

माहितीनुसार, जळगावहून सकाळी ८.१५ वाजता पुण्याकडे रवाना होणारे विमान प्रत्यक्षात सुमारे १०.२० वाजता उड्डाण केले. त्यामुळे विमानतळावर प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.

सलग दुसऱ्या दिवशीही विमानसेवा विलंबाने सुरू झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळेवर विमानसेवा मिळणे ही प्रवाशांची अपेक्षा असताना वारंवार होणाऱ्या विलंबामुळे त्यांच्या कामांवर आणि नियोजनावर परिणाम होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

विशेषतः व्यावसायिक बैठका, शासकीय कामे, वैद्यकीय उपचार तसेच शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या विलंबाचा फटका बसत असल्याचे सांगण्यात आले. विमानसेवा नियमित आणि वेळेवर सुरू राहण्यासाठी संबंधित विमान कंपनीने प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

जळगाव विमानतळावरून सुरू झालेल्या हवाई सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी वारंवार होणारा विलंब ही चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विमान कंपनी आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0