Ticker

🔴 BREAKING NEWS
Loading...

Ad Code

मंत्री गिरीश महाजन यांच्या बदनामीप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांचा संताप; कठोर कारवाईची मागणी



यावल/रावेर | प्रतिनिधी

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात सोशल मीडियावर कथित बदनामीकारक पोस्ट प्रसारित झाल्याच्या प्रकरणावरून यावल-रावेर परिसरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित व्यक्तीवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

भाजप कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमधून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा प्रकारामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला.

यावल येथील पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कायद्याचा धाक कायम राहावा आणि सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडली.

यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0