अमळनेर - तालुक्यातील एकलहरे गावात कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना १ जून रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गावकऱ्यांनी आणि हिंदू संघटनांनी आरोपीला चांगलाच धडा शिकवत यथेच्छ चोप दिला.
घडली काय घटना?
घर बांधकामाच्या ठिकाणी मिस्त्री म्हणून काम करणारा समीर अक्रम अली खान (वय २२, रा. अमळनेर) याने गल्लीतील एका अल्पवयीन मुलीकडे पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर तो थेट घरात शिरून मुलीचा हात पकडत तिला "आपण उद्या पळून जाऊ" असे सांगत आपला मोबाईल नंबर दिला. त्यावर कोणाला काही सांगितल्यास तिला आणि तिच्या पालकांना ठार मारण्याची धमकीही दिली.
ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया
मुलीने घडलेली घटना पालकांना सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत आरोपीला धरून चांगलीच धुलाई केली. बजरंग दलाचे कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. मारहाणीनंतर आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस गुन्हा नोंद
या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ७४, ३२९(४), ३५१(२) आणि पोक्सो कायदा कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.
🟥 महत्वाचे मुद्दे:
आरोपी मजुराकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड
धमकी देत मोबाईल नंबर देऊन पळून जाण्याचा प्रयत्न
ग्रामस्थ आणि संघटनांनी आरोपीला चोप दिला
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
0 टिप्पण्या