Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

JALGAON NEWS : कुसुंबा शिवारातून गावठी कट्टा जप्त, २२ वर्षीय तरुणाला MIDC पोलिसांनी घेतलं ताब्यात


जळगाव : 
तालुक्यातील कुसुंबा गावात एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एक २२ वर्षीय तरुण ताब्यात घेतला असून, त्याच्या घरून तब्बल २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांना कुसुंबा शिवारात एक संशयित व्यक्ती गावठी शस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने साई सिटी परिसरात शोध घेतला असता, संशयास्पदरित्या वागत असलेला एक तरुण पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान त्याचे नाव चेतन वसंत देऊळकार (वय २२, रा. कुसुंबा) असल्याचे समोर आले. त्याच्याकडे कट्ट्याबाबत विचारणा केल्यावर त्याने आपल्या घरातून तो काढून दिला. पोलिसांनी गावठी कट्टा जप्त करत गुन्हा नोंदवला आहे.

ही कारवाई निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, तसेच गणेश ठाकरे, नितीन ठाकूर व विशाल कोळी यांच्या पथकाने केली. पुढील तपास उपनिरीक्षक धनके व कॉन्स्टेबल योगेश घुगे करीत आहेत.

या कारवाईमुळे गावात खळबळ उडाली असून, अवैध शस्त्रधारकांविरोधातील पोलिसांची ही कार्यवाही लक्षवेधी ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या