Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Jalgaon Agriculture"शेती उद्ध्वस्त! गारपीटीचा फटका – जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचा तातडीचा दौरा"




जळगाव जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. विशेषतः करंज, किनोद, कठोरा, भादली खुर्द आणि भोकर या गावांतील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. हरभरा, गहू, केळी, डाळींब यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. कुर्बान तडवी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी बाधित भागांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि पिकांची पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

श्री. तडवी यांनी सांगितले की, “शेतीपिकांचे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाला अहवाल सादर केला जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळू शकेल.” महसूल विभागाशी समन्वय साधून कृषी विभागाकडून सर्व आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत, कोणतीही गरज असल्यास कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.


Unseasonal Rain Jalgaon "अवकाळी पावसाने जळगावला हादरवले! पालकमंत्र्यांचे तातडीचे आदेश – पंचनामे त्वरित करा!"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या