जळगाव | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. पूर्वी ९ ते १४ मे दरम्यान होणाऱ्या या परीक्षा आता १६ ते २४ मे या कालावधीत पार पडणार आहेत.
परीक्षा केंद्रे आणि वेळा पूर्ववत राहणार असून कोणत्याही परीक्षा केंद्रात अथवा वेळेत बदल करण्यात आलेला नाही, असे ICAI ने स्पष्ट केले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार फायनल, इंटरमिजिएट आणि आयएनटीटी-एटी (International Taxation – Assessment Test) या सर्व परीक्षांचा समावेश आहे.
सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणेः
-
शुक्रवार, १६ मे:
-
फायनल परीक्षा (ग्रुप २) पेपर ५ – इंडायरेक्ट टॅक्स लॉ
-
आयएनटीटी-एटी पेपर १ – इंटरनॅशनल टॅक्स ट्रान्सफर प्रायसिंग
-
-
रविवार, १८ मे:
-
फायनल परीक्षा (ग्रुप २) पेपर ६ – इंटिग्रेटेड बिझनेस सोल्युशन्स
-
आयएनटीटी-एटी पेपर २ – इंटरनॅशनल टॅक्स प्रॅक्टिस
-
-
मंगळवार, २० मे:
-
इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप २) पेपर ४ – कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग
-
-
गुरुवार, २२ मे:
-
इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप २) पेपर ५ – ऑडिटिंग अँड एथिक्स
-
-
शनिवार, २४ मे:
-
इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप २) पेपर ६ – फायनान्शियल मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट
-
ICAI ने अधिसूचनेत विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा तिकिटांवर दिलेल्या वेळेनुसारच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या