Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

JALGAON NEWS देवकरांच्या पक्षप्रवेशावर पालकमंत्र्यांचा टोला, गुप्त बैठकीचा गौप्यस्फोट



जळगाव - माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी करत गुप्त बैठकीचा गौप्यस्फोट केला.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, "देवकर यांनी त्यांच्या कारभारामुळे स्वतःच अडचणीत आले असून, ती 'घाण' साफ करण्यासाठी पक्ष बदलत आहेत." तसेच, गेल्या सहा महिन्यांपासून देवकर यांचे तोंड बंद का होते, असा सवाल करत विधानसभेपूर्वी देवकरांची तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्यासोबत बैठक झाली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रवादी शरद पवार गटातील पाच माजी आमदार ३ मे रोजी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील म्हणाले, "अजित पवार म्हणतात की ते माणसे तपासून घेतात, पण त्यांनी फार 'छान' माणसं तपासली आहेत. लवकरच त्यांना कळेल की त्यांनी चुकीचे माणसे तपासली."

देवकर यांच्यावर जिल्हा बँक, मजूर फेडरेशन, पतसंस्था अशा विविध प्रकरणांमध्ये कर्जविषयक अडचणी असल्याचेही पालकमंत्र्यांनी सूचित केले. तसेच, "अजित पवार यांनी देवकर यांना पक्षात घेताना त्यांनी पूर्वी केलेली भाषणे पुन्हा ऐकावीत – त्यात त्यांनी कोणती स्तुती केली होती हे तपासावे," असा सल्लाही त्यांनी दिला.

राजकीय वर्तुळात या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून, आगामी राजकीय घडामोडींवर याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या