Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

BHUSAWAL NEWS भुसावळ बसस्थानकाबाहेर वाहतूक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष ठरतंय जीवघेणे



BHUSAWAL BUS STAND NEWS : भुसावळ शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकाबाहेर दररोज वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा बसस्थानकाच्या भिंतीलगत उभ्या राहत असल्याने संपूर्ण रस्त्यावर अडथळा निर्माण होतो. दुसरीकडे खासगी वाहनेही बिनधास्तपणे उभी केली जातात, त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडते.

दुपारी २ ते ४.३० या वेळेत विशेषतः या भागात वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. या वेळेत एसटी बस, रिक्षा, खासगी गाड्या व सामान्य दुचाकींच्या संख्येत मोठी वाढ होते. यामुळे प्रवासी व वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. स्थानिक व्यापारी, रहिवासी व प्रवाशांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे.

वाहनांची वाढती संख्या, नियोजनाचा अभाव व रिक्षा चालकांची मनमानी ही वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे ठरत आहेत. त्यामुळे या परिसरात केवळ गोंधळच नाही, तर गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुलभ ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. रिक्षांना ठरावीक उभ्या राहण्याची जागा, नो-पार्किंग झोनची अंमलबजावणी, आणि वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती आवश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या