जिल्हास्तरीय बैठकीत नवीन जबाबदाऱ्यांची घोषणा; संघटन विस्तारावर भर
अमळनेर | जळगाव हिंदू जागरण मंच, जळगाव जिल्ह्याची जिल्हास्तरीय बैठक अमळनेर येथे पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला अधिक बळ देण्यासाठी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाभर संघटन विस्तारासह विविध आयाम अधिक सक्रिय करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीत मंचाच्या कार्यपद्धती, संघटन विस्तार, विविध आयामांचे नियोजन आणि आगामी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुकानिहाय संघटन मजबूत करून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे उभारण्यावर विशेष भर देण्यात आला.
थेट तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा अपडेट...
https://whatsapp.com/channel/0029Vb68EiMJJhzR7qNXEn0F
लिंकवर क्लिक करून फॉलो करा...
जिल्हा संयोजक म्हणून सागर नेवे यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक कामकाज पुढे नेण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच अतुल हाडा यांच्यासह विविध पदाधिकारी आणि आयाम प्रमुखांवर संघटन विस्ताराची जबाबदारी सोपविण्यात आली.
बैठकीत युवा, महिला सुरक्षा व सन्मान, संपर्क, प्रचार, विधी, निधी, कार्यालय आणि स्वावलंबन या विविध आयामांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात या सर्व आयामांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले.
यावेळी देवगिरी प्रांताचे सहसंयोजक शंकरजी डापके, युवा आयाम प्रमुख भास्करजी महाजन आणि विधी आयाम प्रमुख अॅड. मिनाक्षी संगीत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये संघटनात्मक कार्य वाढविण्यासाठी अमळनेर, चोपडा, धरणगाव, एरंडोल, भडगाव, चाळीसगाव, पारोळा, पाचोरा तसेच जळगाव महानगरात कार्यरचना अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाली.
आगामी वराह जयंती, विजयादशमी आणि शक्ती पूजन यांसारखे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम जिल्ह्यात विविध ठिकाणी व्यापक स्वरूपात राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीला अॅड. वसंत भोलाणकर, अॅड. मनिषा दीक्षित, केतन अग्रवाल, अॅड. नंदनी कुलकर्णी, कमलाकर पाटील, मनु निळे यांच्यासह विविध आयामांचे प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील संघटनात्मक काम अधिक गतिमान करण्याचा आणि तालुकानिहाय संघटन उभारणीला वेग देण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
हिंदू जागरण मंच जळगाव, जळगाव जिल्हा कार्यकारिणी, हिंदू जागरण मंच कार्यकारिणी, अमळनेर बैठक, जळगाव बातम्या, जळगाव न्यूज, संघटन विस्तार, सागर नेवे, हिंदू जागरण मंच जळगाव बैठक


0 टिप्पण्या