Ticker

🔴 BREAKING NEWS
Loading...

Ad Code

आमदाराचे WhatsApp अकाउंट हॅक; हॅकरकडून पैशांची मागणी

जळगाव जिल्ह्यात खळबळ; परिचितांना पैशांची मागणी करणारे संदेश, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन



अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांचे WhatsApp अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हॅक झालेल्या अकाउंटवरून विविध व्यक्तींना पैशांची मागणी करणारे संदेश पाठविण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

हा प्रकार लक्षात येताच आमदार अनिल पाटील यांनी संबंधितांना याबाबत माहिती देऊन सायबर क्राईमकडे तक्रार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

थेट तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा अपडेट...
https://whatsapp.com/channel/0029Vb68EiMJJhzR7qNXEn0F 
लिंकवर क्लिक करून फॉलो करा...

दरम्यान, आमदारांच्या नावाने किंवा त्यांच्या WhatsApp क्रमांकावरून पैशांची मागणी करणारा कोणताही संदेश प्राप्त झाल्यास नागरिकांनी तातडीने सावध राहावे. कोणत्याही परिस्थितीत पैसे पाठवू नयेत. संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच OTP, बँक खात्याची माहिती, पासवर्ड किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये.

हॅक झालेल्या क्रमांकावर आलेल्या संशयास्पद संदेशांना उत्तर न देता संबंधित व्यक्तींना त्याची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आमदारांच्या नावाचा वापर करून फसवणुकीचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारचा संदेश प्राप्त झाल्यास अफवांवर विश्वास न ठेवता त्याची तातडीने खात्री करून घ्यावी.

Jalgaon News विशेष: आमदारांच्या WhatsApp अकाउंटचा गैरवापर करून पैशांची मागणी करण्यात आल्याने डिजिटल सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अनोळखी किंवा संशयास्पद संदेशांवर विश्वास न ठेवता कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अधिकृत माध्यमातून संपर्क साधणे आवश्यक आहे.


Jalgaon MLA WhatsApp hacked, Amळner WhatsApp hack, WhatsApp account hacked, hacker demanding money, Jalgaon cyber crime, WhatsApp fraud Maharashtra  

जळगाव आमदार WhatsApp हॅक
WhatsApp अकाउंट हॅक
हॅकरकडून पैशांची मागणी
अमळनेर WhatsApp हॅक
जळगाव सायबर क्राईम
WhatsApp फसवणूक
सायबर फसवणूक
आमदार WhatsApp हॅक न्यूज
जळगाव ब्रेकिंग न्यूज
अमळनेर ब्रेकिंग न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0