Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

love jihad 📰 बुरखा न घातल्यास जीवे मारण्याची धमकी; जळगावात 'लव्ह जिहाद' प्रकरण उघडकीस


जळगाव:
यावल तालुक्यातील एका २२ वर्षीय तरुणीला जळगावात बोलवून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बुरखा घालण्यास भाग पाडण्यात आले. बुरखा काढल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. हे सर्व एका मुस्लिम तरुणाने "लव्ह जिहाद"च्या पार्श्वभूमीवर केल्याचा संशय असून या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ही धक्कादायक घटना बुधवार, ४ जून २०२५ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता घडली. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.


पिडीत तरुणी ही यावल तालुक्यातील असून ती चोपडा येथील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दरम्यान, फरहान हकीम खाटीक (रा. किनगाव, ता. यावल) हा देखील त्याच कॉलेजमध्ये शिकत असून, दोघे एकाच बसमधून प्रवास करत होते. १ जानेवारी २०२२ पासून ते ४ जून २०२५ पर्यंत दोघांमध्ये स्नॅपचॅटवर ओळख वाढली.

या काळात फरहानने सतत मुलीवर मानसिक दबाव टाकून तिचं "प्रपोजल" स्वीकारण्याचा आग्रह धरला. "तू मला नाही म्हणशील, तर मी आत्महत्या करेन" अशी धमकी त्याने अनेक वेळा दिली होती.

४ जून रोजी, पीडित तरुणी जळगावातील डीमार्ट येथे खासगी कामासाठी आली असता, फरहान व त्याचा मित्र जमील कुरेशी (रा. किनगाव) यांनी तिचा पाठलाग केला. या वेळी फरहानने तिला जबरदस्तीने बुरखा घालण्यास भाग पाडलं, "बुरखा न घातल्यास आत्महत्या करेन" अशी धमकी दिली.

पीडित तरुणीने घाबरून बुरखा घातला, आणि आरोपींसोबत डीमार्टमध्ये खरेदी करण्यास देखील भाग पाडण्यात आलं. इतकंच नव्हे, तर "बुरखा काढलास तर जीवे ठार मारीन" अशी थेट धमकी दिली गेली.

त्यानंतर तरुणीने घरी परतल्यानंतर ही माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत फरहान हकीम खाटीकला अटक केली आहे.

या प्रकरणात प्रेमाच्या नावाखाली मानसिक छळ, धमक्या, आणि धार्मिक आडचणी निर्माण केल्याचा ठपका असून, ‘लव्ह जिहाद’प्रकरणाची शक्यता गृहीत धरून अधिक तपास सुरू आहे. जिल्ह्यात अशा प्रकारांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या