जळगाव न्यूज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबवण्यात आलेल्या 100 दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेचा निकाल 1 मे रोजी जाहीर झाला असून, जळगाव जिल्हा प्रशासनाने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्याने नागरिकाभिमुख सेवा, कार्यपद्धतीतील नवकल्पना आणि डिजिटल गव्हर्नन्समध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही कामगिरी साध्य झाली असून, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी त्यांना याचे श्रेय दिले आहे.
🔹 उल्लेखनीय उपक्रम आणि सुधारणा:
-
‘जळगाव संवाद’ ऑडिओ-व्हिज्युअल तक्रार निवारण प्रणाली सुरू करून नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची सुविधा मिळाली.
-
‘शेतसुलभ योजना’ अंतर्गत तुकडा नोंदींमधील प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना थेट लाभ.
-
‘JIVANT’ मोहीमेमुळे मृत व्यक्तींची नावे शासकीय याद्यांतून हटविण्यात यश.
-
23000 जुन्या संचिकांचे वर्गीकरण व अभिलेखांचे डिजिटायझेशन.
-
नागरिकांना ऑनलाईन अर्जासाठी jalgaon.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध.
-
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कार्यालयीन प्रक्रियेसाठी.
-
ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी अंमलबजावणी — 16,000 हून अधिक फाईल्स निकाली.
-
ई-क्वासी-ज्यूडिशियल प्रणाली — ऑनलाईन सुनावणी व आदेश सुविधा सुरू.
-
UDAN योजनेअंतर्गत हवाई सेवा सुरू — जळगाव ते मुंबई, पुणे, गोवा, हैदराबाद आणि अहमदाबाद मार्गांवर 1 लाखाहून अधिक प्रवाशांना लाभ.
-
सोशल मीडियाद्वारे 10 लाख नागरिकांपर्यंत योजनांची माहिती.
-
साप्ताहिक बँक समन्वय बैठका, शेतकरी-गुंतवणूकदार संवाद, पाण्याचे व्यवस्थापन आदी बहुआयामी उपाययोजना.
या सर्व उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडले असून, राज्य शासनाच्या मूल्यमापनात जळगाव जिल्ह्याने राज्यात तिसरे स्थान पटकावले.
🙌 पुढाकाराचे कौतुक:
या यशस्वी मोहिमेचे कौतुक केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रउद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी केले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद आणि जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
डॉ. आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वात राबवलेली ही सुधारणा मोहीम "कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श" ठरली आहे.
0 टिप्पण्या