Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

sunflower-oil NEWS "भारत-पाक संघर्षाचा परिणाम! खाद्यतेल प्रतिकिलो ₹५ महाग"


जळगाव | भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण स्थितीचा थेट परिणाम देशातील खाद्यतेल बाजारावर झाला असून सूर्यफुल आणि सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो साडेतीन ते पाच रुपयांनी वाढले आहेत.

गुरुवारीच झालेली वाढ शुक्रवारीही स्थिर राहिली, मात्र व्यापाऱ्यांनी पुढील दरवाढीचे संकेत दिले आहेत.
सूर्यफुल तेल गुरुवारी १४९ रुपये प्रति किलो होते, ते आता १५३ रुपये झाले आहे.
सोयाबीन तेलाचे दर १२९ वरून १३३ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

विविध कंपन्यांच्या पॅकेजिंग तेलांमध्येही हीच दरवाढ दिसून येत आहे. मात्र, शेंगदाणा तेलाचे दर मात्र १४८ ते १५० रुपये प्रति किलोवर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

या दरवाढीमागे भारत-पाकिस्तान संघर्षामुळे निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय अस्थिरता, निर्यातीवरील संभाव्य परिणाम आणि बाजारातील अनिश्चितता हे प्रमुख घटक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या