यावल न्यूज : यावल तालुक्यातील बारावीच्या निकालात मुलींनी आपली सरस कामगिरी सिद्ध करत पुन्हा एकदा गुणवत्तेची आघाडी घेतली आहे. विविध शाळा व महाविद्यालयांमधून आलेल्या निकालांवरून स्पष्ट होते की, यावर्षीही मुलींनी एकापेक्षा एक सरस गुण मिळवत टॉपर ठरण्याचा मान पटकावला आहे.
शहरातील सरस्वती विद्या मंदिराचा निकाल ७५ टक्के लागला असून, पवन सतीश जावरे (६४%) आणि सानिया राजू तडवी (६२.१७%) हे टॉपर ठरले.डॉ. जाकीर हुसेन उर्दू स्कूलने ८४.९७ टक्के निकालाची नोंद करत विशेष लक्ष वेधले. विज्ञान शाखेत फिरदौस जहाँ युसूफ खान (७८.८३%) प्रथम आली, तर मोहंमद बासीत शकील अहेमद शेख, अबूजर खान, आलिया बानो (७५.८२%) आणि मोहंमद अफ्फान (७५.१७%) हे इतर टॉपर ठरले. कला शाखेत मशीरा बानो शेख इब्राहिम (६०.१७%) हिने आघाडी घेतली.
साकळीतील शारदा विद्या मंदिराचा निकाल ६७.५३% लागला. नेहा माळी (६९.३३%) प्रथम, तर अजय कोळी (६३%) द्वितीय क्रमांकावर होता.
अंजुमन-ए-इस्लाम उर्दू हायस्कूल, साकळी येथील विज्ञान शाखेचा निकाल ८६.७६% आणि कला शाखेचा ५१.१६% होता. मोहंमद कामरान साजीद बेग विज्ञान शाखेतील टॉपर ठरला.
बामणोद येथील कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात, विज्ञान शाखेचा निकाल ९८.२५% आणि कला शाखेचा ६७.४४% लागला. विज्ञान शाखेत गायत्री सरोदे (८६.१७%), तोष्वी (७१%), आणि सैय्यद मिस्बा बानो (६९.८३%) टॉपर ठरल्या. कला शाखेत रुखसारबी मणियार (६७.८३%), निकहत मणियार, मिस्बा खाटीक (६४.५०%) आणि फायजा खाटीक (६४.१७%) गुणांच्या बाबतीत पुढे होत्या.
ललित बहऱ्हाटे (८४.५०%) आणि श्रावणी जोशी (८३.६७%) हे देखील विज्ञान शाखेतील टॉपर ठरले, तर कला शाखेत दीपाली सपकाळे (६७.६७%) व धीरज सोनवणे (६२%) यांची आघाडी होती.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन होत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींच्या लक्षणीय सहभागामुळे शिक्षण क्षेत्रात महिलांचे योगदान अधोरेखित झाले आहे.
0 टिप्पण्या