अमळनेर न्यूज | तालुक्यातील निम येथे २ जून रोजी तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
📍 नदीवर पोहायला गेले अन्… परतलेच नाहीत
मृत मुले:
चेतन धनराज पवार (९ वर्षे)
मयुर उर्फ हरीश बाळू पाटील (१२ वर्षे)
गावातील लग्नसमारंभानंतर दोघेही तापी नदीवर गेले. संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने शोध घेतला असता, त्यांचे कपडे नदीकाठावर सापडले.
💔 चेतनचा मृतदेह सापडला; मयूरचा शोध सुरुच
चेतनचा मृतदेह सापडून शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
मयूरचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
🧑🌾 कुटुंबाची पार कौल कोसळली
मयूरचे वडील शेतमजूर, त्याला एक बहीण आहे.
चेतनचे वडील मृत, तो आजोबांकडे राहत होता, त्यालाही एक बहीण आहे.
दोन कुटुंबातील वारस गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
🚔 पोलीस तपास सुरू
मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, फिरोज बागवान, संजय पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
0 टिप्पण्या