चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा दर ९५८०० रुपये होता. मंगळवारी त्यात १४०० रुपयांची वाढ होऊन तो दर १००११६ रुपये (जीएसटीसह) पर्यंत पोहोचला. बुधवार आणि गुरुवारी दर पुन्हा लाखावर होते, पण शेवटी पुन्हा खाली आले.
एप्रिल महिन्यात २१ व २२ तारखेला सोन्याचा दर १००४२५ व १०९९७० रुपये होता, जो विनाजीएसटी ९९००० रुपये होता. त्यानंतर दरात घट झाली होती, परंतु ही घटसुद्धा अगोदरच्या तुलनेत १३०० रुपयांनी महाग होती.
मे महिन्यातील घसरणीनंतरही सोनं तब्बल ३९०० रुपयांनी महागलेलं आहे. तरीही सध्याच्या लग्नसराईत मागणी कायम आहे. त्यामुळे जाणकारांचा अंदाज आहे की, लवकरच सोन्याचे दर पुन्हा वाढू शकतात.
दरम्यान, चांदीच्या दरात मात्र स्थिर चढ-उतार दिसून येत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ९५ ते ९७ हजार प्रति किलो दराने व्यवहार होत असून, दरामध्ये प्रतिदिन १ ते २ हजार रुपयांचा बदल होत आहे.
0 टिप्पण्या