Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Gold Rate News : जळगावमध्ये दोन दिवसांत सोन्याच्या दरात 9300 रुपयांची घसरण



जळगाव न्यूज | जळगावच्या सराफा बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी सोन्याचा प्रतितोळा दर तब्बल १३०० रुपयांनी घटून ९२८०० रुपये (GSTसह ₹९५,५८४) इतका खाली आला आहे. यामुळे ग्राहकांसाठी ही सध्याची परिस्थिती खरेदीसाठी योग्य असल्याचे जाणकार सांगतात.

यापूर्वी सोमवार (१० मे) रोजी सोन्याचा दर ९३,८०० (GSTसह ₹९६,६१४) रुपये होता. मंगळवारी (११ मे) त्यात अचानक ₹१,००० वाढ होऊन तो ९४,८०० (GSTसह ₹९७,६४४) इतका गेला होता. मात्र, बुधवारी त्यात पुन्हा ₹७०० ची घसरण झाली आणि गुरुवारी अजून ₹१,३०० नी खाली येऊन सोन्याच्या दरात एकूण ₹९,३०० ची घट नोंदवली गेली.

चांदीही झाली स्वस्त

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घट नोंदवली गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून चांदीचे दर ₹९८,००० प्रति किलोवर स्थिर होते. गुरुवारी चांदीच्या दरात ₹२,००० ची घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांच्याही दृष्टिकोनातून चांदी खरेदी करण्यास ही योग्य वेळ ठरू शकते.

आंतरराष्ट्रीय बाजाराचे पडसाद

सोन्याच्या दरात झालेल्या या घटीचे कारण आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित करेक्शन असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारात अमेरिकेतील महागाई, डॉलरचा दर, तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण होणारे अनिश्चिततेचे वातावरण यामुळे ही उलथापालथ होत असल्याचे सांगितले जात आहे.

जळगाव शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, सोने खरेदीसाठी ही वेळ ग्राहकांसाठी फायदेशीर असू शकते, मात्र दर आणखी खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी विचारपूर्वक आणि गरजेनुसार खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या