जळगाव – हरिविठ्ठल नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा केला जाणार असून, यानिमित्ताने १२ व १३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रींच्या पादुकांसह ग्रंथांची दिंडी, अभिषेक, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन होणार आहे.
१२ मे रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत गणानाम सत्संग परिवारातर्फे भजन संध्या होईल. तर १३ मे रोजी सकाळी गजानन महाराज व पादुकांचा अभिषेक होईल. संध्याकाळी ५ वाजता संतोष बारी यांच्या घरून श्रींच्या पवित्र पादुकांची मिरवणूक आणि ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.
ही दिंडी नगरातून फिरून सायंकाळी ७ वाजता मंदिरात पोहोचेल. त्यानंतर महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप होईल.
कार्यक्रमानिमित्त मंदिर फुलांनी सजवले जाणार असून, आकर्षक रोषणाई देखील करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनात मंदिर समितीचे अध्यक्ष संदीप महाजन, संतोष महाजन, पंडित बारी, राहुल सोनी व विनोद बारी यांचा पुढाकार आहे.
0 टिप्पण्या