Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

JALGAON FRAUD NEWS गहाण संपत्तीची विक्री करून ३१.६२ लाखांची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा


कर्ज घेऊन गहाण ठेवलेली मालमत्ता परस्पर विकून बँकेची फसवणूक.


जळगाव – शहरातील फेड फायनान्स या खासगी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता तिसऱ्या व्यक्तीला विकून ३१ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेड फायनान्स बँकेचे विभागीय व्यवस्थापक अरुण विनायक खोब्रागडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्य आरोपी योगेश भाऊराव गवांदे आणि भाग्यश्री गवांदे (रा. खेडगाव, ता. जामनेर) या दोघांनी सहा आरोपींनी बनावट कागदपत्रांचा आधार घेत कर्ज मंजूर करून घेतले.

फसवणुकीसाठी गाव नमुना ८, गावठाण प्रमाणपत्र व कर पावत्यांची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यांचा उपयोग करून बँकेकडून कर्ज घेतले गेले. कर्जासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता बँकेची परवानगी न घेता तिसऱ्या पक्षाला विकली गेली. तसेच कर्जाची परतफेडही करण्यात आली नाही.

या प्रकरणात सहकारी आरोपी म्हणून आकाश गोरख पाटील, पूजा आकाश पाटील, गोरख खुला पाटील, सुनीता गोरख पाटील (सर्व रा. धर्मवीर संभाजीनगर, पाचोरा) यांचाही समावेश आहे.

याप्रकरणी फसवणूक, बनावट कागदपत्र सादर करणे व मालमत्तेचा गैरवापर आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या