गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव परिसरात ४३ अंशांपर्यंत तापमान गेले होते. यामुळे शेतकरी उष्णतेने त्रस्त असतानाच आता अवकाळी पावसाच्या संकटाने चिंता वाढली आहे. सध्या तालुक्यात मका व उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. शेतात पडलेली मक्याची कणसे व चारा भिजल्याने मका काळा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. कांद्याचेही नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी उत्पादन व भाव या दोन्ही आघाड्यांवर अडचणीत सापडले आहेत.
हवामान विभागाने पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज दिल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील पिके वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे.
0 टिप्पण्या