Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

JALGAON MIDC NEWS उमाळ्यात भरधाव अज्ञात वाहनाची धडक! दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी, वाहनचालक फरार

जळगाव तालुक्यातील उमाळा गावाजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या धक्कादायक अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद जगन्नाथ वाघ (वय ४६, रा. उमाळा, ता. जळगाव) हे प्रमोद वाघ यांच्यासह दुचाकी (MH-19-BY-9761) वरून प्रवास करत होते. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास, भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघे रस्त्यावर फेकले गेले व त्यांना डोक्याला, कपाळाला, नाकाला, मनगटाला आणि कमरेला गंभीर दुखापती झाल्या आहेत.

अपघात इतका भीषण होता की दुचाकी पूर्णतः नुकसानग्रस्त झाली. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी तत्काळ मदत करून दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या घटनेबाबत विनोद वाघ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक गफ्फार तडवी हे करत आहेत.

या घटनेनंतर वाहनधारकाने पळ काढला असून, पोलिसांनी वाहन आणि चालकाचा शोध सुरू केला आहे. या प्रकारामुळे उमाळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या