Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

अल्पवयीन मुलगी रिक्षा स्टॉपवरून फुस लावून पळवली! रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा



JALGAON NEWS जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर मुलगी वयाने १६ वर्षांची असून, ती नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजेच्या सुमारास घराजवळील रिक्षा स्टॉपवर गेली होती. मात्र, काही वेळातच ती गायब झाल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. परंतु कुठेही ती सापडली नाही. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली.

तक्रारीनुसार, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून तिच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले आहे. सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस विभाग सतर्क झाला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, आणि परिसरातील साक्षीदारांची चौकशी सुरू असून, लवकरच आरोपीचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे खंडेराव नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष ठेवावे, अशी शिफारस पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या