Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

JALGAON NEWS जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न

जळगाव - आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी आता मंत्रालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही! मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ जिल्हास्तरावरच मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष" कार्यान्वित करण्यात आला असून, याचे उद्घाटन आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने संपन्न झाले.  



या वेळी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, कक्ष प्रमुख डॉ. सिद्धार्थ चौधरी यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. शासनाने २२ फेब्रुवारी २०२५ रोजी या संदर्भातील आदेश निर्गमित केला होता.  

काय आहे या कक्षाचे कामकाज?
- रुग्ण व नातेवाईकांना अर्ज प्रक्रियेत मार्गदर्शन  
- अर्जांची सद्यस्थिती व प्रगतीची माहिती  
- तक्रारींचे निवारण व अर्ज प्रक्रियेचा पाठपुरावा  
- आर्थिक मदत लाभलेल्या रुग्णांना रुग्णालयात भेट  
- निधीसाठी पात्र आजारांचे पुनर्विलोकन  
- जनजागृती, प्रचार व देणग्या वाढवण्यावर भर  




रुग्णांसाठी कशा होणार सुविधा?
- अर्ज प्रक्रिया सुलभ व पारदर्शक  
- आवश्यक कागदपत्रांची यादी स्थानिक स्तरावर उपलब्ध  
- संलग्न रुग्णालयांची माहिती मिळणार  
- मंत्रालयीन दौऱ्याची गरज संपणार  
- अर्जाची स्थिती जिल्ह्यातच मिळणार  

राज्यस्तरीय कक्ष प्रमुखपदी श्री. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

हा निर्णय गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरणार असून, प्रशासनाच्या या सकारात्मक पावलामुळे उपचारासाठीची आर्थिक मदत आता जलद आणि सुलभ पद्धतीने पोहोचणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या