Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

CBSE NEWS सीबीएसई निकालाच्या तारीखाविषयी सोशल मीडियावरील अफवा फेटाळल्या; बोर्डाची अधिकृत घोषणा अद्याप बाकी


जळगाव – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात २ मे रोजी एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रात निकालाची तारीख आणि त्यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. मात्र, सीबीएसईने ही सूचना बनावट असल्याचे स्पष्ट करत ती फेटाळून लावली आहे.

व्हायरल पत्रात दहावीचा निकाल ६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक आणि जन्मतारीख वापरून निकाल पाहावा लागेल, असेही त्यात नमूद होते. उत्तीर्ण होण्यासाठी ३३% गुणांची अट आणि अन्य तपशीलही या बनावट पत्रात दिले गेले होते.

सीबीएसईने यासंदर्भात स्पष्टीकरण देत सांगितले की, निकालाच्या कोणत्याही तारखेची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच, कोणतीही महत्त्वाची माहिती फक्त अधिकृत वेबसाइट – cbse.gov.in वरूनच देण्यात येईल, असेही बोर्डाने विद्यार्थ्यांना स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सोशल मीडियावरील अशा अप्रामाणिक माहितींवर विश्वास न ठेवता, फक्त अधिकृत स्रोतांवरच भर द्यावा, असे आवाहन सीबीएसईने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या