या मदतीसाठी त्यांनी शुक्रवार, दिनांक २७ एप्रिल रोजी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे निवेदनासह धनादेश सुपूर्द केला. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारामुळे सुरेश नाईक अत्यंत व्यथित झाले होते. देशावर आलेल्या संकटाच्या काळात आपणही काही योगदान द्यावे, या भावनेतून त्यांनी ही देणगी दिली.
“दहशतवाद्यांचा कायमस्वरूपी बीमोड झाला पाहिजे. आणखी किती काळ असे हल्ले सहन करणार? आपल्या देशात शांतता, सुरक्षितता आणि स्थिरता नांदली पाहिजे. या लढ्यात सरकारला खर्च येणारच, आणि त्यासाठी मी माझा खारीचा वाटा उचलला आहे,” असे सुरेश नाईक यांनी यावेळी सांगितले.
सामान्य शेतकऱ्याने देशाच्या सुरक्षेसाठी आपली कमाई सरकारच्या मदतनिधीत दिल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या सामाजिक भान ठेवणाऱ्या कृतीमुळे अनेक नागरिकांना प्रेरणा मिळत असून, अशा प्रकारे समाजातील प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे, असे मतही व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या