Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

JALGAON NEWS : प्रेमभंगाच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या; इंस्टाग्रामवर ‘माफ करा’ स्टेट्स ठेवत जीवनयात्रा संपविली


जळगाव – प्रेमभंगाच्या नैराश्यातून एका तरुणाने महाविद्यालयाच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सतीश कोळी (वय १९), नूतन मराठा महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. तो आई-वडिलांविना अनाथ असून होस्टेलवर राहून शिक्षण घेत होता.




सतीशचे एका मुलीवर मनापासून प्रेम होते. मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. या प्रेमभंगामुळे सतीश अत्यंत निराश झाला होता. रविवारी सुटी असल्याने महाविद्यालय बंद होते. त्याच दिवशी पहाटे सतीशने महाविद्यालयाच्या दुचाकी वाहनतळ परिसरातील झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी सतीशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर "मला माफ करा" असा भावनिक स्टेट्स टाकला होता. हा स्टेट्स पाहून त्याचे मित्र चिंतेत पडले आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत सतीशने आयुष्याचा शेवट केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.

सतीशचे मित्र अत्यंत भावूक झाले होते. त्यांच्यामते सतीशने आपल्या आयुष्याच्या जोडीदाराची स्वप्ने पाहिली होती. मात्र प्रेमभंगाच्या धक्क्याने त्याने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेमुळे महाविद्यालयात हळहळ व्यक्त करण्यात येत असून तरुणांच्या मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेची गरज अधोरेखित झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या