हा पक्षप्रवेश पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या घडामोडींमुळे जळगाव जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघण्याची चिन्हं आहेत. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला जिल्ह्यात अपयशाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आणि नैराश्याचं वातावरण आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना अशा प्रकारचे पक्षांतर शरद पवार यांच्या गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो. काही दिवसांपूर्वी डॉ. सतीश पाटील यांनी पक्ष सोडण्याचे सूतोवाच करताना, "विरोधी बाकावर बसताना कार्यकर्त्यांच्या समस्या सुटत नाहीत," असे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेला जोर मिळाला होता.
0 टिप्पण्या