जळगाव आणि भुसावळ रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी! मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते सहरसा (बिहार) दरम्यान नवीन ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ साप्ताहिक गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, २ मेपासून या गाडीचा शुभारंभ होणार आहे.
🛤️ गाडीचा थांबा – जळगाव आणि भुसावळमध्येही!
या गाडीला जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आता आणखी सोयीस्कर होणार आहे.
📅 गाडी वेळापत्रक:
गाडी क्र. 11015: प्रत्येक शुक्रवार – एलटीटी, मुंबईहून १२ वाजता सुटणार आणि रविवार दुपारी २ वाजता सहरसा येथे पोहोचणार.
गाडी क्र. 11016: प्रत्येक रविवार – सहरसा येथून पहाटे ४.२० वाजता सुटणार, सोमवारी दुपारी ३.४५ वाजता एलटीटी, मुंबईला पोहोचणार.
📍 थांबे असलेली प्रमुख स्थानके:
ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज, पाटलीपुत्र, हाजीपुर, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, खगडिया इ.
🚆 कोच रचना:
८ शयनयान, ११ सामान्य डबे, १ पेंट्रीकार, २ गार्ड ब्रेक व्हॅन – प्रवाशांसाठी पुरेशी जागा आणि सुविधा!
🛡️ सुरक्षेचीही जय्यत तयारी!
पहलगाम हल्ल्यानंतर रेल्वे सुरक्षा अधिक चोख करण्यात आली आहे. जळगाव व भुसावळ स्थानकांवर विशेष सतर्कता, सीसीटीव्ही, कर्मचारी तैनात – प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा सज्ज!
➡️ अमृत भारत एक्स्प्रेसमुळे जळगाव व भुसावळवासीयांना मिळणार प्रवासात गती आणि सुविधा – रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना विनंती: सहकार्य करा आणि सुरक्षित प्रवास करा!
0 टिप्पण्या