दुर्दैवी घटना कशी घडली?
नागेश्वर कॉलनीत राहणारा अरविंद सचिन गायकवाड (वय ४) हा अंगणात खेळत असताना पिसाटलेल्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. कुत्र्याने अरविंदच्या गळ्याला चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. स्थानिक तरुणांनी तत्काळ धाव घेत त्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
११ नागरिक जखमी – प्रशासनाचे दुर्लक्ष
या कुत्र्याने गेल्या काही दिवसांत परिसरातील एकूण ११ नागरिकांना चावा घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज एका बालकाचा जीव गेला, असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
नागरिकांची मागणी:
पिसाटलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा
दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी
संपूर्ण परिसरात कुत्रे नियंत्रण मोहिम राबवावी
0 टिप्पण्या