जळगाव | जळगाव जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी ‘ही दिवाळी नवीन घरी’ हा अभिनव उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या योजनेत पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण टप्पा २) अंतर्गत दिवाळीपूर्वी अधिकाधिक लाभार्थ्यांना गृहप्रवेशाचा आनंद देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सध्या जिल्ह्यात सुमारे ९० हजार घरकुलांचे काम सुरू असून, त्यापैकी किमान ७५% घरे ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.
या मोहिमेंतर्गत निर्धारित वेळेत घरकुल पूर्ण करणाऱ्यांना विशेष सन्मान व पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे स्थानिक साहित्य, कुशल मनुष्यबळाचा उपयोग करून दर्जेदार, सुरक्षित व पक्के घरकुल निर्माण केले जातील.
यातून ग्रामपंचायतींमध्ये कार्यक्षमतेची सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल व ग्रामीण भागातील गरजूंना आपल्या हक्काच्या घरात दिवाळी साजरी करण्याची संधी मिळेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या