पीडित महिला प्रियंका शिवा खरात (वय २०, रा. नशिराबाद) हिचे लग्न जानेवारी २०२४ मध्ये मुंबईतील शिवा दिनकर खरात यांच्याशी पारंपरिक पद्धतीने पार पडले होते. तक्रारीनुसार, लग्नानंतर अवघ्या काही आठवड्यांतच सासरच्या लोकांनी किरकोळ कारणांवरून शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि मानसिक त्रास देणे सुरू केले. या अविरत छळामुळे अखेर प्रियंका माहेरी परत आली.
तिने ९ मे रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली. त्यात पती शिवा दिनकर खरात, सासरे दिनकर मारुती खरात, सासू अनिता खरात, चुलत जेठ रमेश खरात, मोठी सासू कलाबाई खरात, ननंद जयाबाई जाधव, लक्ष्मी अंभोरे व ज्योती वाघमारे (सर्व रा. मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल फकीरा रंधे करत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणात लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या